शॉन टेट झाला भारताचा जावई!,shaun tait married with Indian girl

शॉन टेट झाला भारताचा जावई!

शॉन टेट झाला भारताचा जावई!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेटनं भारतीय मॉडेल माशूम सिंघासोबत लग्न केलंय. चार वर्षांपासून असलेल्या प्रेमाला दोघांनी १२ जूनला लग्नाचं रुप दिलं. लग्न मुंबईला झालं असून शॉनचे मित्रही या विवाहाला उपस्थित होते. तर भारतीय क्रिकेट टीमचे झहीर खान आणि युवराज सिंगनं लग्नाला हजेरी लावली होती.

इंग्रजी वर्तमान पत्र इकोनॉमिक टाईम्सच्या माहितीनुसार, एका वर्षापूर्वी पॅरीसला असताना शॉनने माशूमला लग्नासाठी मागणी घातली होती. २०१०च्या आयपीएल दरम्यान दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर शॉननं लग्नाची मागणी घातल्यानंतर २०१३च्या ऑगस्टमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. या वर्षीच्या २०१४ शॉनला कोणीही विकत घेतलं नव्हतं, त्याआधी शॉन राजस्थान टीममधून खेळला होता. लग्नानंतर मासून ऑस्ट्रेलियाला स्थायिक होणार आहे.

लग्नानंतर मिसेस टेट ऑस्ट्रेलियाला स्थायिक होऊन तिथं आपला स्वतःचा व्यवसाय करणार असल्याचं, सूत्रांनी सांगितलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 20, 2014, 18:15


comments powered by Disqus