Last Updated: Tuesday, February 12, 2013, 16:09
www.24taas.com, मुंबईशर्लिन चोप्रा आपल्या बिनधास्त आणि अश्लील कृत्यांमुळे चर्चेत असते. यावेळीही ती चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिचं चर्चेत राहाण्यामागचं कारण वेगळं आहे. शर्लिन चोप्राच्या वाढदिवसाचं निमित्त तिला पुन्हा चर्चेत घेऊन आलं आहे. मात्र, यावेळी शर्लिनचं वेगळंच रूप पाहायला मिळालं.
११ फेब्रुवारी रोजी शर्लिन चोप्राचा वाढदिवस होता. हा वाढदिवस शर्लिन कसा साजरा करणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. ती आपला वाढदिवस हटके पद्धतीनेच साजरा करणार याबद्दल सर्वांनाच खात्री होती. पण, नेमकं ती काय करणार याबद्दल कुणालाच अंदाज नव्हता. शर्लिनने आपला वाढदिवस चक्क कामाठीपुऱ्यामधील वेश्यांसोबत साजरा केला. मुख्य म्हणजे सामाजिक भान ठेवत तिने या गोष्टीचा गाजावाजा केला नाही.
शर्लिन आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईतील कुप्रसिद्ध कामाठीपूरा या वेश्यावस्तीत गेली. तिथे शर्लिनने वेश्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. तेथील सेक्स वर्कर्ससोबत शर्लिनने केक कापला. या केकवर ‘सेलिब्रेटिंग वूमनहूड’ असं लिहिलं होतं. या भागातील वेश्यांची ओळख गोपनीय राहावी, यासाठी शर्लिनने तेथे मीडियाला आमंत्रित केलं नाही. तसंच, आपल्या वाढदिवसाचे फोटोग्राफ्सही काढले नाहीत. कामाठीपूरा ही मुंबईतील सर्वांत जुनी आणि अशियातील दुसऱ्या क्रमांकाची वेश्यावस्ती आहे.
First Published: Tuesday, February 12, 2013, 16:09