Last Updated: Thursday, May 23, 2013, 15:26
www.24taas.com झी मीडिया, कान्सबॉलिवूड अभिनेत्री ऐशवर्या रायने जेव्हा कान्स फिल्म महोत्सवमध्ये रेड कार्पेटवर आली त्यानंतर लोकांचे लक्ष लागून राहिले होते की, शर्लिने चोप्रा केव्हा येणार? आणि ती जेव्हा आली त्यानंतर तिने साऱ्यानांच घायाळ करून टाकलं. शर्लिन अत्यंत बोल्ड अवतारात रेड कार्पेटमध्ये अवतरली. आपला सिनेमा कामसूत्र ३-डीचे प्रमोशन करण्याच्या दरम्यान फिल्म महोत्सवात अभिनेत्री शर्लिन चोप्राने आपला मादक अदांनी साऱ्यानांच घायाळ करून सोडलं. आणि सारेच जण फक्त तिलाच पाहत बसले.
काळ्या रंगाच्या पारदर्शी वस्त्रात आलेल्या शर्लिनने करोडो लोकांचे लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं. यावेळेस सिनेमाची पूर्ण टीम कान्स महोत्सवात सिनेमाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. कामसूत्र गर्ल आणि ट्विटर क्वीन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शर्लिनने आपल्या फॅन्सना सांगितले की, कामसूत्र - ३डीचा दुसरा ट्रेलर कान्स महोत्सवात दाखविला
कामसूत्र ३डी सिनेमा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत तयार होत आहे. तसेच शर्लिनचा आयटम नंबर सिनेमाच्या शेवटी दाखविण्यात येणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 23, 2013, 14:12