Last Updated: Friday, November 23, 2012, 13:15
www.24taas.com, पणजीगोव्यात झालेल्या आतंरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात एनएफडीसी फिल्म बाजारात गुरवारी शर्लिन चोप्राने अभिनय केलेला सिनेमा `कामसूत्र ३डी` याचा फर्स्ट लूक दाखविण्यात आला आहे.
वात्सायनच्या कामसूत्रवर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन रूपेश पॉलने केलं आहे. आणि शर्लिन याच्या प्रमुख भुमिकेत आहे. दिल बोले हडिप्पा आणि रकीब यासारख्या बॉलिवूडच्या सिनेमात छो़ट्या भुमिका करणाऱ्या शर्लिनला प्रथमच पहिली मोठी फिल्म मिळते आहे.
फिल्मच्या प्रवक्त्यांनी सागिंतले की, कामसूत्र ३डी चे निर्माते रूपेश पॉलच्या प्रॉडक्शनने आपल्या सिनेमाच्या प्रचारासाठी फिल्म महोत्सवमध्ये ह्या सिनेमाची झलक दाखविली आहे.
First Published: Friday, November 23, 2012, 13:03