Last Updated: Wednesday, November 27, 2013, 17:30
www.24taas.com, झी मीडिया, गोवागोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये `कामसूत्र थ्रीडी` चित्रपटाचा `टूडी` ट्रेलर अभिनेत्री शर्लिन चोप्रा, मिलिंद गुणाजी आणि दिग्दर्शक रुपेश पॉल यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
रुपेश पॉल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट वात्सायनाच्या कामसूत्रावर आधारीत आहे. शाररिक संबंधातील प्रेम भावना आणि कामुकता या विषयावर भाष्य करणे अद्याप आपल्या समाजात वर्जित मानले जाते. अशा विषयावर `थ्रीडी` स्वरूपातील चित्रपट बनविण्याचे धाडस दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी केले आहे.
२०१३ च्या `कान चित्रपट महोत्सवात` चांगली कामगिरी केलेल्या या चित्रपटाने अमेरिका, युरोप आणि अशियातील वितरणाच्या अधिकाराद्वारे मोठ्या प्रमाणावर कमाई केली. `आरपीपीएल`ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात शर्लीन चोप्रा काम देवीच्या भूमिकेत, तर मिलिंद गुणाजी पराक्रमी राजाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी स्वत: लिहिली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, November 27, 2013, 17:30