शर्लिनने नाचणार ५० न्यूड डान्सरसह, Sherlyn Chopra`s `Kamasutra 3D` video goes viral on YouTube

शर्लिनने नाचणार ५० न्यूड डान्सरसह

शर्लिनने नाचणार ५० न्यूड डान्सरसह
www.24taas.com, मुंबई
ग्लॅमर विश्वात शर्लिन चोपडाने असे काही कारनामे केले आहे, की तिच्या संबंधीत कोणतीही बातमी सोशल मीडिया आणि इंटरनेटवर खळबळ माजवते. फॅन्सला या बिकिनी गर्लबद्दल नवीन काही असेल तर ते जाणून घेण्यात नेहमी उत्सुकता असते. सध्या शर्लिन चोपडा आपल्या आगामी कामसूत्र ३डीच्या शुटींगमध्ये खूपच व्यस्त आहे.

कामसूत्र ३ डी अजून प्रदर्शितही झाली नाही, तरी त्याच्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. कामसूत्र ३ डीमध्ये शर्लिनने सुमारे ५० न्यूड (नग्न) डान्सरसह डान्स करणार असल्याचे नुकतेच बी टाऊनच्या सूत्रांनी सांगितले आहे.

कामसूत्र ३ डीतील गाण्यांपैकी एक गाण्यात तीने ५० न्यूड डान्सरसह डान्स केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या गाण्यात शर्लिन मुख्य रोलमध्ये असणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रुपेश पॉल करीत आहे. या गाण्याची शुटिंग राजस्थानमध्ये करण्यात येणार आहे. मात्र, राजस्थानमध्ये ही जागा कुठली आहे याचा खुलासा करण्यात आला नाही. हे गाणे १४ व्या शतकावर आधारीत आहे. या गाण्याची कोरिओग्राफी बॉलिवुडची एक सुप्रसिद्ध कोरिओग्राफर करणार आहे.

शर्लिन चोपडाने गेल्या काही दिवसांपूर्वी एक अनसेंसर्ड फोटोशूट व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा अनसेंसर्ड व्हिडिओ इंटरनेटवरही अपलोड केला आहे. तो पाहण्यासाठी लोकांच्या उड्या पडत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यावर चांगलीच खळबळ माजली आहे.

गेल्या २४ तासांत या व्हिडिओला ३० लाख जणांनी पाहिले आहे. बोल्डनेसमुळे हा व्हिडिओ अधिक पाहिला गेल्याचे सांगितले जात आहे. या शर्लिने फारच मादक पोझ दिल्या आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यावर आपण अंदाज लावू शकतो की, कामसूत्र ३डी किती बोल्ड असू शकते. यात शर्लिन चोपडा टॉपलेस दाखवली आहे.

First Published: Wednesday, January 23, 2013, 21:39


comments powered by Disqus