शर्लिन चोप्रा पुन्हा कामसूत्र-३डीमध्ये , Sheryln Chopra, Kamasutra 3D

शर्लिन चोप्रा पुन्हा कामसूत्र-३डीमध्ये

शर्लिन चोप्रा पुन्हा कामसूत्र-३डीमध्ये
www.24taas.com, मुंबई

ट्विटर क्वीन आणि प्लेबॉय मॅगझीनला बोल्ड फोटोशूट देणारी शर्लिन चोप्रा पुन्हा कामसूत्र-३डीमध्ये दिसणार आहे. रूपेश पॉल याच्या कामसूत्र-3Dमधून शर्लिनला काढून टाकल्याची बातमी आली होती.

रूपेश पॉल आणि शर्लिन यांच्यात चर्चा झाल्यानंतर वाद संपुष्टात आला. त्यामुळे पुढील महिन्यात राजस्थानमध्ये होणाऱ्या शुटींगसाठी शर्लिन तयार झाली आहे. दिग्दर्शन रूपेश पॉलने काही अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य केल्यानंतर शर्लिनला पुन्हा काम देण्यात आले आहे. ती लवकरच शुटींगमध्ये सहभाग घेणार आहे.

रूपेश पॉलने सांगितले की, शर्लिन माझ्या हॉटेलमध्ये आली. तिने कामसूत्र-3Dची सीडी मागितली. ती सीडी कुठे दाखविणार नसल्याचे सांगितल्यानंतर मी तिला सीडी दिली. मात्र, तिची मागणी मी आधी धुडकावली होती.


शर्लिन चोप्राने दिग्दर्शकला न सांगताच एक व्हिडिओ इंटरनेटवर टाकला होता. त्यामुळे त्यांच्यातील बोलनी फिस्कटली आणि ती कामसूत्र-3Dमधून बाहेर पडल्याची चर्चा होती. शर्लिनने इंटरनेटवर व्हिडिओ टाकल्याने रूपेश पॉल नाराज होता. त्यामुळे तिला बाहेच रस्ता दाखविण्यात आला होता. आता पुन्हा सर्व सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे.

First Published: Wednesday, February 27, 2013, 17:31


comments powered by Disqus