कसा आहे थ्रीडी शोले?

कसा आहे थ्रीडी शोले?

Tag:  shole review
कसा आहे थ्रीडी शोले?
शोले थ्री डीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी शोलेचं थ्रीडी आवृत्ती तयार होऊ नये, म्हणून आटोकाट प्रयत्न केले.

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर आपल्याला थ्रीडी आवृत्तीशी काही घेणे देणे नसल्याचं रमेश सिप्पी यांनी म्हटलं आहेय. चित्रपटाची थ्रीडी आवृत्ती बनवण्यासाठी चांगली मेहनत घेण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र चित्रपटातील काहीचं दृश्य थ्रीडी बनवण्यात आली आहेत.

थ्रीडी चित्रपट पाहण्याची खरी मजा तेव्हा येते. जेव्हा संबंधित दृष्यात एखादी वस्तू अंगावर येण्याचा भास होतो. या चित्रपटात फार थोडकी दृष्य अशी आहेत, ज्यामुळे थ्रीडी तंत्रज्ञानाची मजा घेता येते. काही दृश्य तुम्ही थ्रीडीचा चष्मा काढून पाहून शकता. कारण यातील सर्वच दृश्य थ्रीडी नाहीत.

थ्रीडी शोलेचं निर्मात्यांनी मोठ्या प्रमाणात प्रमोशन न केल्याने, प्रेक्षक सिनेमा थिएटरपर्यंत किती प्रमाणात येतील हे ही एक प्रश्न चिन्ह आहे.हा चित्रपट पहिल्यांदा 15 ऑगस्ट 1975 रोजी रिलीज झाला होता.

हे ही निश्चित आहे की, आजच्या युवा पिढीचा सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार बदलला आहे. शोलेचे मुख्य कलाकार अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, धर्मेंद्र, अमजद खान आणि संजीव कपूर या युवा पिढीच्या हिरोची आता जागा घेऊ शकणार नाहीत.

शोलेने नंतर सर्वात जास्त लोकप्रियता मिळवली ८० आणि ९० च्या दशकात जिथंही शोले रिलीज करण्यात आला, शोलेवर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या, शोलेज डायलॉग लोकांनी डोक्यावर घेतले. गाणी वर्षानुवर्ष गायली, गुणगुणली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 4, 2014, 23:51


comments powered by Disqus