काळवीट शिकार : नीलम, सोनाली बेंद्रे, तब्बू जोधपूर न्यायालयात, Fresh Charges by Court against Tabu , Neelam and Sonali B

काळवीट शिकार : नीलम, सोनाली बेंद्रे, तब्बू जोधपूर न्यायालयात

काळवीट शिकार : नीलम, सोनाली बेंद्रे, तब्बू जोधपूर न्यायालयात
www.24taas.com , वृत्तसंस्था, जोधपूर

काळवीट (ब्लॅकबक) शिकार प्रकरणी आज नीलम, सोनाली बेंद्रे, आणि तब्बू जोधपूर न्यायालयात येणार आहेत. या प्रकरणातल्या प्रत्यक्षदर्शी पूनमचंद बिश्वोई मार्फत या तिघींचीही ओळख पटवण्यात येईल.

याआधी या तिघींनाही खटल्याच्या सुनावणीवेळी अनुपस्थित राहण्याची सूट मिळाली होती. मात्र यावेळी ओळखपरेड असल्यामुळे तिघींनाही उपस्थित राहावं लागणार आहे. १ ऑक्टोबर १९९८ या दिवशी काळवीट शिकार झाली होती.

सलमान खान, सैफ अली खान, नीलम, सोनाली बेंद्रे, आणि तब्बू यांच्यावर शिकार केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. अभिनेता सैफअली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर १४ वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी स्थानिक न्यायालयाने नव्याने आरोप निश्‍चित केले आहेत.

वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ९/५१ आणि ९/५२ तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १४९ अंतर्गत हे आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी दरम्यान, सैफसह, सोनाली, तब्बू आणि नीलम यांनी हे आरोप नाकारले. अभिनेता सलमान खान याच्यावरही याप्रकरणी आरोप आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, October 11, 2013, 13:20


comments powered by Disqus