व्हिलन वडिलां(शक्ती कपूर)वर ओरडायची श्रद्धा, shraddha kapoor in aashiqui-2

व्हिलन वडिलां(शक्ती कपूर)वर ओरडायची श्रद्धा

व्हिलन वडिलां(शक्ती कपूर)वर ओरडायची श्रद्धा
www.24taas.com, मुंबई
अभिनेता शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरला आपल्या वडिलांनी खलनायकाची भूमिका करणे आवडत नव्हते. ‘रॉकी’, ‘कुर्बानी’, ‘हिम्मतवाला’ और ‘हीरो’, सारख्या चित्रपटांत खलनायकाची भूमिका बजवणारा शक्ती कपूर बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध खलनायक म्हणून नावारुपाला आला.

पण शक्ती कपूरला स्वतःच्या घरातूनच खलनायकाची भूमिका करू नये म्हणून विरोध होता. हा विरोध त्याची मुलगी श्रद्धा कपूर करत होती. ती त्याच्यावर ओरडायची सुद्धा असे तिने एका मुलाखतीत सांगितले. मला खूप दुःख व्हायचे. परंतु, मला माझ्या आईने सांगितले की ते केवळ अभिनय करतात.

मला त्यांची हास्य कलाकार म्हणून वढवलेल्या भूमिका खूप आवडतात. खऱ्या आयुष्यात ते खूप मस्करी करतात. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेची बहिणीची मुलगी असलेल्या श्रद्धाचे म्हणणे आहे की, घऱात नेहमी चित्रपटासंदर्भात चर्चा होते. मला माझी मावशी आणि वडील नेहमी अभिनयाबद्दल सल्ला देतात. माझ्या वडिलांचा विचार करण्याची तऱ्हा खूप वेगळी आहे, असे श्रद्धाने सांगितले.

श्रद्धाने २०१०मध्ये अमिताभ आणि माधवन यांच्यासह ‘तीन पत्ती’ या चित्रपटात काम केले होते. तो चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर ती २०११मध्य लव का दी एंडमध्ये दिसली होती. या चित्रपटानेही साधारण कामगिरी केली होती.

श्रद्धा आता मुकेश भट्ट यांच्या आगामी ‘आशिकी २’ चित्रपटात आदित्य रॉय कपूरसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे प्रोमोज् सध्या टीव्हीवर झळकतात आहे.

First Published: Monday, April 15, 2013, 15:31


comments powered by Disqus