श्रृती-जॉनचा रोमांन्स,shruti- john romance together

श्रृती-जॉनचा रोमांन्स

श्रृती-जॉनचा रोमांन्स
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवू़डची हॉट एन्ड सेक्सी अभिनेत्री श्रृती हसन लवकरच अभिनेता जॉन अब्राहमसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

जॉन आणि श्रृती एकत्र `वेलकम बॅक` या चित्रपटात काम करत आहे. 2007 ला रिलिज झालेला वेलकम चित्रपटाचा हा सिक्वेल असणार आहे.

मात्र याच चित्रपटात ही जोडी एकत्र दिसणार नसून निशिकांत कामतचा चित्रपटात `रॉकी हॅडसम` मध्येही दिसणार आहेत. त्या चित्रपटात श्रृती जॉनच्या बायको रोल करताना दिसणार आहे.

सध्या हैदराबादला `रॉकी हॅडसम` शूटींग सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जॉन सुध्दा फुटबॉलवर एक फिल्म बनवणार आहे.

जॉन फुटबॉल चाहता आहेच. पण चर्चा आहे की, जॉन या फिल्ममध्ये खऱ्याखुऱ्या खेळांडूना घेणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 22, 2014, 14:33


comments powered by Disqus