Last Updated: Wednesday, January 15, 2014, 20:51
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअमिताभ आणि रेखा हे ‘दो अंजाने’ सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांना भेटणं टाळतात.
मात्र विसाव्या स्क्रीन अवॉर्ड सोहळ्यात अमिताभ स्वत: रेखा यांच्या जागेजवळ गेले आणि रेखा यांना नमस्कार करून त्यांचं स्वागत केलं, एवढंच नाही जया बच्चन यांनीही रेखाची भेट घेतली.
रेखानेही अमिताभ आणि जया बच्चन यांना आदरपूर्वक नमस्कार केला, हा क्षण रेखा आणि अमिताभच्या चाहत्यांसाठी यादगार ठरणार आहे.
अमिताभ रेखाला का भेटला? रेखा आणि अमिताभ काही वर्षांपासून एकमेकांना टाळत होते. मात्र एवढ्या दिवसानंतर अमिताभला रेखाला स्वत:हून भेटून नमस्कार का करावसा वाटला? रेखाने फिल्मफेअरला १९८४ मध्ये मुलाखत दिली होती, यात रेखाने म्हटलं होतं, 'आमच्या प्रेमातून त्याने पळ काढला. कारण त्याला त्याची सद्गृहस्थाची, कौटुंबिक माणसांची प्रतिमा जपायची होती. तसेच त्याला कुणालाच दुखवायचं नव्हतं; परंतु होय, आमचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं' असंही रेखानं त्यावेळी स्पष्ट केलं होतं.
रेखाच्या बोलण्याप्रमाणे अमिताभने खरोखर प्रेमातून त्यावेळी पळ काढला असेल, तर याची खंत त्याच्या मनात आजही कायम असेल का?, म्हणूनच अमिताभ स्वत:हून रेखाला भेटला असेल का? या प्रश्नांचा सिलसिला आता कायम राहणार आहे.
रेखा आणि अभिताभने १९८१ नंतर एकत्र एकाही चित्रपटात काम केलं नाही, सार्वजनिक कार्यक्रमात नजरानजरही हे 'दो अंजाने' टाळत असतं, कारण यांच्यातला `सिलसिला` हा सिनेसृष्टीत मोठा चर्चेचा विषय आहे.
अमिताभ आणि रेखाचा `सिलसिला` `दो अंजाने` या चित्रपटापासून रेखा आणि अमिताभ एकमेकांचे दिवाने झाले आणि त्यांच्या प्रेमकहाणीच्या `सिलसिला`ची जोरदार चर्चा सुरू झाली. रेखा आणि अमिताभ एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची चर्चा सिनेसृष्टीत आधीपासून होत होती. प्रेक्षकांनाही रेखा आणि अमिताभला एकत्र पडद्यावर पाहण पसंत होतं.
`सिलसिला` पडद्यावरचा आणि पडद्यामागचा या जोडीच्या प्रेमकरणाच्या चर्चेला एकेकाळी एवढा ऊत आला होता की, यश चोप्रा यांनी अमिताभ, जया आणि रेखाला घेऊन सिलसिला हा चित्रपट बनवला, हा सिलसिला थांबावा म्हणून जयानेही चित्रपटात काम करण्यास होकार दिला.
सिलसिला तसा पडद्यावर जास्त चालला नाही, मात्र पडद्यामागचा सिलसिलाही यानंतर बंद झाला. `दो दिवाने` पुन्हा एकमेकांना ओळखत असूनही `दो अंजाने` झाले.कारण अमिताभच्या जीवनात जया बच्चन आल्या होत्या.
मध्यंतरी रेखा खासदारपदी आली तेव्हा रेखा आणि जया बच्चन यांनीही एकमेकांशी बोलणं टाळलं होतं.
आमच्या प्रेमातून त्याने पळ काढला`फिल्मफेअर`ला १९८४ मध्ये रेखाने मुलाखत दिली, यात स्पष्टीकरण देतांना रेखा म्हणाली, आमच्या प्रेमातून त्याने पळ काढला.
कारण त्याला त्याची जंटलमनची, कौटुंबिक माणसांची प्रतिमा जपायची होती. तसेच त्याला कुणालाच दुखवायचं नव्हतं; परंतु होय, आमचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं, असंही रेखानं त्यावेळी स्पष्ट केलं होतं.
‘दो अंजाने’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रेखावर अमिताभची मोहिनी पडली होती. या सदाबहार जोडीने त्यानंतर खून - पसिना, गंगा की सौगंध, सुहाग, मुकद्दर का सिकंदर, राम - बलराम, मिस्टर नटवरलाल आणि शेवटचा सिलसिला हा चित्रपट केला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 15, 2014, 18:52