‘सिंघम 2’ नाही तर ‘सिंघम रिटर्न्स’?, singham 2 now singham returns?

‘सिंघम 2’ नाही तर ‘सिंघम रिटर्न्स’?

‘सिंघम 2’ नाही तर ‘सिंघम रिटर्न्स’?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दिग्दर्शक रोहीत शेट्टी आणि अभिनेता अजय देवगन ही हीट जोडी पुन्हा एकदा अॅक्शनचा डबल डोस घेऊन येतेय. या नवीन सिनेमाचं नाव काय असेल अशी चर्चा आता सुरु झालीय.

2011 साली मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणारा ‘सिंघम’ या चित्रपटातून या जोडीनं प्रेक्षकांवर ताबा मिळवला होता. मराठमोळ्या नायकाची भूमिका बजावणारा या सिनेमातला हिरो ‘सिंघम’ही मराठी प्रेक्षकांनी उचलून धरला होता. याचाच पुढचा भाग म्हणून ‘सिंघम 2’ या नावानं नवीन सिनेमा बनवण्याचं काम रोहीतनं हाती घेतलंय. पण या नवीन सिनेमाचं नाव ‘सिंघम 2’ तर ‘सिंघम रिटर्नस’ असेल, अशी शक्यता आहे.

‘गोलमाल’ सिरीजमधल्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेली अजय देवगन आणि करीना कपूर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. अजय-करीनाची जोडीही प्रेक्षकांना चांगलीच भावलेली दिसतेय.

अजय आणि रोहीत शेट्टीनं एकत्र येत अनेक कॉमेडी आणि अॅक्शन फिल्म दिल्यात. यात गोलमाल, ऑल द बेस्ट, बोल बच्चन या सिनेमांचा समावेश आहे. ‘सिंघम रिटर्न्स’ ऑग्सट महिन्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 08:35


comments powered by Disqus