Last Updated: Tuesday, September 24, 2013, 15:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेता सैफ अली खानने दोन लग्न केल्यानंतर त्याने बहिणीला लग्नाबाबत सल्ला दिलाय. सोहा ४०शीनंतर लग्न कर, असे सैफ अनुभवावरून बहिणीला सांगतोय.
शर्मिला टागोरला आपल्या मुलीच्या भवितव्याची काळजी आहे. शर्मिलाने आपल्या लाडक्या सोहाला लग्नाचा सल्ला दिलाय की, लवकर लग्न कर. सोहा सध्या अभिनेता कुणाल खेमूसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. त्यामुळे आईच्या मते (शर्मिला) सोहाने आता विवाहबध्द व्हावं, पण भाऊ सैफनं सोहा अली खानला लग्नाचा निर्णय घेतांना कोणत्याही प्रकारची घाई करू नये, असा सल्ला दिलाय.
सोहा आणि कुणाल रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. हे दोघे नुकतेच दोघे नवीन घरात राहायला गेलेत. मात्र दोघांचाही इतक्यातच लग्नाचा विचार नाही. आम्ही लग्न करावं, यासाठी माझ्या आईन खूप वेळा सांगितलं. आता तिनं याबद्दल मला सांगणं बंद केलंय. आईचं ऐकलं असतं तर आतापर्यंत मला २० मुलं असती, असं सोहाने स्पष्ट केलं.
लग्नाचा निर्णय घेतांना कोणत्याही प्रकारची घाई करू नये, तर वयाच्या चाळीशीपर्यंत मी लग्न करावं असा सल्ला सैफनं दिला असल्याचे सोहानेच सांगितलं.
येत्या ४ ऑक्टोबरला सोहा पस्तीशीची होणार आहे. सोहाने पुढं सांगितलंय की, लग्न म्हणजे महत्त्वपूर्ण बंधन. कुणाल हा विनोदी आहे. तो मला कायम आनंदी ठेवतो. आता सोहा आईचं ऐकणार की भावाचे याकडे लक्ष लागले आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, September 24, 2013, 15:41