Last Updated: Friday, November 30, 2012, 16:33
www.24taas.com, मुंबईदिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला सिनेमा `सन ऑफ सरदार` याने भारतीय सिनेमाघरात तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्तचा यांच्यासारख्या तगड्या स्टार कास्ट असणाऱ्या या सिनेमाने १००.५५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात भारतात ७१.५३ कोटींची कमाई केली होती.
या सिनेमासोबतच १३ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला यश चौप्रा यांचा दिग्दर्शित सिनेमा `जब तक है जान`ने ही भारतात १०० कोटींचा आकडा २३ नोव्हेंबरला पार केला होता.
सन ऑफ सरदारची प्रस्तुती `वायकॉम १८ मोशन पिक्चर` आणि `इरोज इंटरनॅशनल` यांनी केली होती. तर सिनेमाची निर्मीती अजय देवगण फिल्म्स आणि वायआरवी इंफ्रा अँण्ड मीडिया (पी) लिमिटेड प्रोडक्शनने केली आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन अश्वनी धीरने केली आहे.
First Published: Friday, November 30, 2012, 16:19