सोनाक्षीला आपल्या फिगरचा अभिमान Sonakshi loves her figure

सोनाक्षीला आपल्या फिगरचा अभिमान

सोनाक्षीला आपल्या फिगरचा अभिमान
www.24taas.com, मुंबई

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाला आपल्या गोल गरगरीत फिगरचा अभिमान आहे. मीडियाशी बोलतानाही बऱ्याचवेळा तिने सांगितलं, की मी माझं वाढतं वजन कमी करण्याचा विचारच करत नाही. मात्र तिच्या या फिगरमुळे तिला एका जाहिरातीवर पाणी सोडावं लागलं आहे.

एका उत्पादनाच्या जाहिरातीसाठी सोनाक्षी सिन्हाला जाहिरात करण्यासांबंधी विचारलं होतं. मात्र यासाठी तिच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले. एक तर तिने आपलं वजन जरा कमी करावं किंवा जाहिरात सोडावी. यावर सोनाक्षीने आपण वजन कमी करणार नसल्याचं सांगत या नामांकीत ब्रँडची जाहिरात नाकारली.

आता या जाहिरातीसाठी दीपिका पादुकोणला विचारण्यात आलं आहे. मात्र सोनाक्षीने आपल्या फिगरसाठी एवढी मोठी जाहिरात नाकारत आपण खरोखरच ‘दबंग गर्ल’ असल्याचं दाखवून दिलंय.

First Published: Saturday, December 1, 2012, 16:13


comments powered by Disqus