Last Updated: Monday, February 25, 2013, 17:10
www.24taas.com, मुंबईसोनाक्षी सिन्हाचे सितारे सध्या सातव्या आस्मानात आहे. ती जे काही काम करते, त्यात तिला यश मिळतंय. आणि लागोपाठ धडाकेबाज सिनेमे देत ती बॉलिवूडमधली एक यशस्वी अभिनेत्री ठरत आहे. आता सोनाक्षी साजिद खानच्या ‘हिम्मतवाला’ सिनेमामध्ये ‘थँक गॉड, इट्स फ्रायडे’ या आयटम नंबरमध्ये ८० च्या दशकातले ठुमके लगावताना दिसणार आहे.
विशेष, म्हणजे या गाण्यात सोनाक्षी ८० च्या दशकातील दोन अभिनेत्रींना कॉपी करताना दिसणार आहे. गाण्याच्या काही भागात ती ‘शान’ सिनेमातील ‘परवीन बाबी’सारखी दिसते तर काही भागात ती ‘चालबाझ’ मधील ‘श्रीदेवी’सारखी. या गाण्यासाठी सोनाक्षी सिन्हा हिच माझी पहिली आणि शेवटची निवड होती, असं साजिद खानने सोनाक्षीबद्दल बोलताना म्हटलं आहे. सोनाक्षी या गाण्यासाठी जर तयार नसती, तर मी हे गाणं सिनेमातून काढून टाकलं असतं, असं साजिद खानने म्हटलं आहे.
यापूर्वी सोनाक्षीने ‘ओह माय गॉड’ या सिनेमात डान्सिंग गॉड प्रभूदेवासोबत ‘गोविंदा’ साँग केलं होतं. हे गाणं आयटम साँग असलं, तरी व्हल्गर नव्हतं. तसंच हिम्मतवाला मधील गाणंही व्हल्गर नाही, असं सोनाक्षीचं म्हणणं आहे. ‘हिम्मतवाला’ या सिनेमात अजय देवगण आणि तमन्ना प्रमुख भूमिका साकारत आहेत. २९ मार्चला हा सिनेमा रिलीज होत आहे.
सोनाक्षी सिन्हाचे सितारे सध्या सातव्या आस्मानात आहे. ती जे काही काम करते, त्यात तिला यश मिळतंय. आणि लागोपाठ धडाकेबाज सिनेमे देत ती बॉलिवूडमधली एक यशस्वी अभिनेत्री ठरत आहे.
First Published: Monday, February 25, 2013, 17:10