सोनाक्षी सिन्हाला मिळाला नवीन फ्रेंड, Sonakshi Sinha got a new friend

सोनाक्षी सिन्हाला मिळाला नवीन फ्रेंड

सोनाक्षी सिन्हाला मिळाला नवीन फ्रेंड
www.24taas.com,मुंबई

‘दबंग’मुळे प्रसिद्धीत आलेली दबंगगर्ल सोनाक्षी सिन्हा मित्राच्या शोधात होती. तिला नवीन मित्र मिळाला आहे. या मित्राचे नाव आहे सिम्बा. शुटींगच्या ठिकाणी सोनाक्षी आणि सिम्बाची गाढ मैत्री झाली आहे. याठिकाणी सोनाक्षी सिन्हा शुटींग संपल्यानंतर मिळलेला वेळ ती सिम्बाला देते.

सोनाक्षी सध्या पटियाला येथे ‘सन ऑफ सरदार’च्या शूट मध्ये व्यस्त आहे. त्याठिकाणी तिला हा नवीन मित्र मिळाला आहे. आता हा सिम्बा कोण आहे, याबाबत तर्कवितर्क लढविले जात असतील. या दोघाची मैत्री सध्या बॉलीवूडमध्ये मात्र चर्चेचा विषय झाली आहे.

‘सन ऑफ सरदार’च्या शुटींग स्थळापासून काही अंतरावर रोटविलर जातीचे छोटे कुत्रे बांधण्यात आले आहेत. यापैकी एक पपी सोनाक्षीला खूप आवडले. सतत सोनाक्षी पपीला सोबत घेऊन फिरत असते. त्याचे लाडाने सिम्बा हे नावदेखील तिनेच ठेवले आहे.

आगामी काळात येत असलेल्या दिग्दर्शक अश्विन धीरच्या ‘सन ऑफ सरदार’ सिनेमात सोनाक्षीशिवाय अजय देवगण, संजय दत्त व जुही चावला प्रमुख भूमिकेत आहेत.

First Published: Saturday, October 6, 2012, 13:39


comments powered by Disqus