Last Updated: Tuesday, April 8, 2014, 14:33
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना रंजनीकांतसोबत काम करण्याची इच्छा आहे. यावेळी मात्र सोनाक्षी सिन्हाची ही इच्छा पूर्ण होणार आहे. ६३ वर्षीय रंजनीकांतसोबत सोनाक्षी रोमांस करतांना चित्रपटात दिसणार आहे.
मात्र सुत्रांनूसार, दोघांच्या वयातील अंतरामुळं चित्रपटात रंजनीकांतला सोनाक्षीसोबत रोमांस करण्यास जमत नाहीय. त्यासाठी चित्रपट संचालक रवी कुमार यांनी रंजनीकांत आणि सोनाक्षी यांच्यासाठी पुन्हा स्क्रिप्टींग बनवलंय.
रंजनीकांतचं वय ६३ वर्ष आहे आणि शत्रुघ्नचं वय ६७ वर्ष. १९७०मध्ये शत्रुघ्न सिन्हाने चित्रपट `प्रेम पुजारी` मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तर रंजनीकांतने १९७५ मध्ये तामिळ चित्रपट `अपूर्व रागंगल` मधून बॉलिवूडला सुरुवात केली. त्यामुळं आता आपल्या वडिलांच्या वयाच्या रजनीकांतसोबत सोनाक्षी कसा काय रोमांस करते हे बघावं लागेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 8, 2014, 13:50