Last Updated: Monday, October 7, 2013, 18:21
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई सोनाक्षी सिन्हाने, शाहीद कपूरच्या कानशीलात लगावलीय. आणि तेही सर्वांसमक्ष आणि तेही अनेकदा! जोपर्यंत कडक आवाज येत नाही तोपर्यंत. याचा खुलासा केलाय स्वतः सोनाक्षीनं!
प्रदर्शनासाठी सज्ज असणाऱ्या प्रभुदेवाच्या ‘आर.. राजकुमार’चं ट्रेलर नुकतेच लॉन्च करण्यात आलं. याप्रसंगी शाहीद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा या जोडीने चित्रीकरणाच्या वेळचे काही प्रसंग सांगितले. पहिल्यांदाच एकत्र काम करणाऱ्या या कलाकारांनी ट्रेलर लॉन्चिंगच्यावेळी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले.
आतापर्यंत साध्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या सोनाक्षीने या चित्रपटात अक्शन सीन केले आहेत. सोबतच शाहीदच्या गालातही खूप लगावल्यात. इतक्यावरच ती थांबलेली नसून तिने शाहीदच्या डोक्यात बाटलीही फोडली आहे.
सोनाक्षीने ट्रेलर लॉन्चिंगच्यावेळी सांगितले की, “प्रभु सरांनी या फिल्ममध्ये माझी इमेज पूर्ण बदलली आहे. मी लाजणारी हीरोइन नसून मारमारी करतांना दिसेल. प्रभु सरांनी या चित्रपटात मला मारामारी करणं, डोक्यात बाटली, फोडणं आणि थप्पड मारणं शिकवलंय. मी शाहीदला खूप थप्पडा मारल्या आहेत. हा सीन करतांना मला बरेच वाईट वाटले. सोनाक्षीच्या म्हणण्यानुसार, "चांगला को-स्टार आहे, तो शांततेने मार खायचा. तो खूप मेहनती आहे.”
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, October 7, 2013, 18:21