अभिनेत्री सोनलची `3जी`तील हॉट फिगर, Sonal ate everything`s looking hot in a bikini

अभिनेत्री सोनलची `3जी`तील हॉट फिगर

अभिनेत्री सोनलची `3जी`तील हॉट फिगर
www.24taas.com,मुंबई

नव्याने येणाऱ्या `3जी` सिनेमात अभिनेत्री सोनल चौहान बिकनीत दिसणार आहे. तिची हॉट फिगर चर्चेचा विषय ठरला आहे. मी नियंत्रित आहारावर विश्वास ठेवत नाही. सर्वकाही खाते. असे असले तरी माझी फिगर नियंत्रित आहे. मला जे आवडते ते मी खाते, असे सोनल सांगते.

`3जी`या सिनेमात सोनल बिकनीत दिसणार आहे. सोनलने या सिनेमात बिकनी घालणार असल्याने तिने आपल्या फिगरवर लक्ष केंद्रीत केले. त्याप्रमाणे तिने मेहनत घेतली. मात्र, हे सांगताना ती म्हणते, स्वत:ला तंदूरूस्त ठेवण्यासाठी काही खास पदार्थ घेतले नाहीत. जे मला पसंत येईल आणि आवडेल तेच खाल्ले. माझ्या मनाला जे पटले ते मी केले. बाकी काही नाही.

सोनलने मीडियाशी बोलताना सांगितले, फिटनेसबाबत माझा एक मंत्र आहे, सब कुछ खाओ. मी डाएटवर विश्वास ठेवत नाही. मी सर्वकाही खाल्ले आहे. असे असले तरी मी जिममध्ये जाण्याचे चुकवत नाही. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि प्रसन्न राहण्यासाठी प्रत्येकाने जिक केलीच पाहीजे.


सोनल चौहान आणि नील नितिन मुकेश `3जी`या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. सिनेमा येण्याआधीच सोनल सध्या बिकनीमुळे नव्हे तर तिच्या फिगरमुळे चर्चेत आहे. तर या सिनेमातील हॉट किसिंगमुळे नील आणि सोनल त्रस्त आहेत. या सिनेमाची हॉट किसिंगमुळे बरीच चर्चा आहे. या सिनेमात ३० चुंबन दृश्य आहेत, अशी चर्चा आहे. मात्र, या सिनेमात केवळ तीन दृश्य असल्याचे सोनम सांगते. यात विशेष असं काही नाही, नेहमीचेच दृश्य आहे. चुंबनामध्ये काही विशेष नाही, असं सोनमने स्पष्टीकरण दिलंय. मात्र, सिनेमा पाहिल्यानंतर खरी बाब समजेल.

First Published: Wednesday, March 6, 2013, 15:54


comments powered by Disqus