लग्न रियाचं... आगपाखड सोनमची!, sonam gets angry on riya kapoor marriage news

लग्न रियाचं... आगपाखड सोनमची!

लग्न रियाचं... आगपाखड सोनमची!
www.24taas.com झी मिडीया, मुंबई
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची लहान मुलगी रीया कपूर पुढच्या महिन्यात लग्न करणार असल्याच्या बातम्या सध्या मीडियामध्ये गाजत आहेत. याच बातम्यांवर भडकलीय रीयाची मोठी बहिण सोनम कपूर...

सोनम कपूरपेक्षा दोन वर्षांनी लहान असूनदेखील रीया लग्नाच्या बाबतीत पुढे जाणार, असं अनेक बॉलिवूड वार्तांमधून सांगण्यात येतंय. इतकंच नाही तर रियाला या गोष्टीसाठी तिच्या वडिलांनी म्हणजेच अनिल कपूर यांनीदेखील मान्यता दिलेली आहे, असंही म्हटलं जातंय. पण, या सगळ्या बातम्या साफ चुकीच्या असल्याचं सोनमनं म्हटलंय.

रीया कपूर ही २००९ मध्ये आलेल्या ‘वेकअप सिद’ या चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. या चित्रपटात रिया आणि करन बलून यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. रियानं २०१० मध्ये आलेल्या ‘आयशा’ या चित्रपटातून सिनेमा सृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटातही करन बलून यानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. करनला आता स्वतंत्रपणे चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरायचंय. ‘सात हिंदूस्थानी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन हाताळणार आहे. करन बलून याच्या कुटुंबीयाशी जवळचे संबंध असल्यानं रिया आणि करन यांच्या लग्नाला दोन्ही घरांतून होकार मिळू शकतो, असं अनेकांना वाटतंय.

रिया आणि करन यांच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आलं असताना रिया नाही तरी तिची मोठी बहिण सोनम मात्र भडकलीय. सोनमनं प्रसार माध्यमांवर चांगलीच आगपाखड केली. ‘रिया आता लग्न करणार नाही... मीडियानं अशा बातम्या देण्याआधी बातमीची पूर्ण खातरजमा करावी’ असं सोनमनं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 30, 2013, 13:11


comments powered by Disqus