Last Updated: Thursday, June 19, 2014, 16:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसोनम कपूरचा 9 जूनला वाढदिवस झाला. फॅशन आयकॉन अभिनेत्री सोनम कपूरनं मुंबईत बर्थ डे पार्टी दिली. या पार्टीला इंडस्ट्रीतील अनेक नामवंत उपस्थित होते. यासोबतच पार्टीला सोनम कपूरचा बॉयफ्रेंड म्हटला जाणारा दिल्लीतील मॉडल साहिर बेरीही उपस्थित होता.
पार्टी संपल्यानंतर साहिर बेरी एका कारमधून तिथून बाहेर पडला. या कारमध्ये सोनम आणि करिष्मा कपूर बसलेले होते. पण तिथं उपस्थित फोटोग्राफर्सला पाहून साहिरनं आपला चेहरा लपवला. जर चेहरा लपवून काही उपयोग नाही असं साहिरला वाटलं तेव्हा त्यानं खाली वाकून डॅशबोर्डखाली लपण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वी अनिल कपूरच्या या लाडक्या मुलीचं नाव फिल्म डिरेक्टर पुनीत मल्होत्रासोबत जोडलं गेलं होतं. पुनीतनं सोनमला `आय हेट लव्ह स्टोरीज` चित्रपटात डिरेक्ट केलं होतं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 19, 2014, 16:22