Last Updated: Tuesday, June 17, 2014, 12:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसोनम कपूर ही पहिलीच भारतीय असेल की, ती आंतरराष्ट्रीय लाइफस्टाईल मॅगझीन प्रेस्टींज हाँगकाँगवर झळकताना दिसलीय.
मॅगझीनमध्ये बॉलिवूड रॉयल्टीज न्यू सेक्सी थीममध्ये सोनम कपूरने फॅशन, चित्रपट आणि आपल्या आयुष्याबद्दल बोलली आहे.
मॅगझीनचे संपादक जॉन वॉल या बाबत म्हणणं आहे की, सोनम कपूरनी सिद्ध केलेय की, ती एखाद्या फोटोग्राफरचं स्वप्न नाहीय तर ती खूपच समजूतदार आहे. शाबास सोनम...
सोनम कपूरने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारर्कीदीत जास्त नाव मिळावले नसले तरी फॅशनच्या दुनियेत सोनमचे नाव पहिले घेतले जाते. बॉलिवूड क्षेत्रात सर्वांत स्टायलिश अभिनेत्री म्हणून सोनम कपूरला मानले जाते.
ईथन हॉक, मोनिका बेलुसी,कार्ल लैगरफील्ड, ईवा लोंगोरिया, एवरिट लेवाइन आणि विन डीजल या आंतरराष्ट्रीय लोकांसोबत भारतीय अभिनेत्री सोनम कपूरचं नाव घेतलं जातं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 17, 2014, 12:54