Last Updated: Sunday, June 9, 2013, 16:32
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर हिचा आज २८ वा वाढदिवस आहे. सोनम ही सुनीता आणि अनिल कपूर यांची मोठी मुलगी आहे. सोनमच्या धाकट्या बहिणीचे नाव रिया तर भावाचं नाव हर्षवर्धन आहे.
सोनमने तिच्या बॉलीवूडमधील करिअरची सुरुवात २००७ मधील ‘सांवरिया’ या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाने केली. त्यानंतर ‘दिल्ली ६’ आणि ‘आय हेट लव्ह स्टोरी’ अशा अनेक चित्रपटांतून तिने अभिनय केला. प्रत्येकवेळी विविध प्रकारच्या भूमिका करण्यावर सोनमने भर दिला.
बॉलीवूडमधील अनेक व्यक्तींकडून सोनमला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत.सर्वात प्रथम शाहीद कपूर आणि बिपाशा बासु यांनी शुभेच्छा दिल्या. झी २४ तासच्या टीमकडूनही सोनमला वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, June 9, 2013, 16:32