सलमान भेटीवर मी बोलणार नाही - शाहरूख, Speak nothing but a hug from Salman: SRK

सलमान भेटीवर मी बोलणार नाही - शाहरूख

सलमान भेटीवर मी बोलणार नाही - शाहरूख
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमध्ये किंग खान आणि दबंग स्टार सलमान खान यांनी गळाभेट घेतली. निमित्त होतं ते इफ्तार पार्टीचं! शाहरूख आणि सल्लूची गळाभेट सध्या चर्चेचा विषय झाली आहे. या भेटीबाबत शाहरूखने काहीही मी बोलणार नाही असे म्हटलंय.

मुस्लिम बांधवांचा रमझान सुरू आहे. या निमित्त इफ्तार पार्टी होती. २१ जुलै रोजी शाहरुख आणि सलमान यांना काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांनी इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले होते. यावेळी दोघांनीही गळाभेट आलिंगन दिले. शाहरूख आणि सल्लूमधील संबंध सर्वांनाच कसे आहेत ते माहित आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीची जास्तच चर्चा झाली.

या भेटीबाबत शाहरूखने बोलण्यास नकार दिला. मीडियांकडून काहीही टिपन्नी नको, असे शाहरूख म्हणाला. शाहरूखचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा सिनेमा येतोय. त्याबाबत तो म्हणाला, मी जे सांगतो, ते इमानदारीसे सांगतो. आपल्या संबंधाबाबत किंवा मैत्रीबाबत तसेच काही जवळची गोष्ट असो. मी कधी सार्वजनिक ठिकाणी कोणाची निंदा किंवा कोणावर टीका केलेली नाही आणि यापुढेही मी असं काही करणार नाही. माझ्याकडून असे होणारही नाही.

माझ्याविषयी खूप काही बोललं गेलं आहे. तसेच खूप काही लिहिलं गेलंय. मात्र मी सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक स्वरूपात काहीही बोलणार नाही आणि कधी बोललेलो नाही, असे शाहरूख म्हणाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, July 26, 2013, 12:06


comments powered by Disqus