सचिनसाठी `बालक-पालक`चं स्पेशल स्क्रिनिंग, special screening of balak palak for sachin tendulkar

सचिनसाठी `बालक-पालक`चं स्पेशल स्क्रिनिंग

सचिनसाठी `बालक-पालक`चं स्पेशल स्क्रिनिंग
www.24taas.com, मुंबई

रितेश देशमुख निर्मित ‘बालक-पालक’ सिनेमानं अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. सचिन तेंडूलकरही त्याला अपवाद ठरलेला नाही. नुकतंच, मुंबईमध्ये खास सचिनसाठी या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं. यावेळ सचिन, सचिनची पत्नी अंजली तसंच माजी क्रिकेटपटू अजित आगरकरही उपस्थित होता.

सध्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीसाठी मुंबईत असणाऱ्या सचिनने `बीपी`साठी खास वेळ काढला. किशोरवयीन मुलांचे भावविश्व उलगडून दाखविणाऱ्या या सिनेमाचं त्यानं कौतुकही केलंय. सचिनच्या उपस्थितीबद्दल बोलताना रवीनं म्हटलंय `हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होता. कारण क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या या सुपरमॅनने आम्ही तयार केलेला `बीपी `(बालक-पालक) पाहिला. त्याने सिनेमाचे मनापासून कौतुकही केले. या आधीचा `नटरंग` हा सिनेमाही त्याला आवडला होता, असेही सचिनने आवर्जून सांगितलंय`. या स्क्रिनिंगसाठी निर्मात रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसुजाही उपस्थित होती.

वन-डे क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सचिन रणजी सारख्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत असतानाच प्रॅक्टिस सेशन झाल्यानंतर फावल्यावेळात सिनेमा पाहण्याचा मनमुराद आनंद लुटत असताना दिसत आहे. काही दिवसापूर्वीच तो आशा भोसले यांनी पहिल्यांदाचा अभिनय केलेल्या ` माई ` या चित्रपटाच्या म्युझिक लाँचला उपस्थिती लावली होती.

First Published: Saturday, January 26, 2013, 12:19


comments powered by Disqus