Last Updated: Sunday, December 22, 2013, 18:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि सिनेमा दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या अंधेरी स्थित बंगल्याला शनिवारी संध्याकाळी शॉटसर्कीटमुळे आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की त्यामुळे श्रीदेवी यांचं बेडरूममधील सर्व वस्तू जळून राख झाल्यात.
या दुर्घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. आगीची बातमी समजल्यानंतर अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळावर दाखल होऊन आगीवर ताबा मिळवला.
सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीदेवी आपल्या मुलींसोबत आणि सासूसोबत याच बंगल्यावर होती. आग लागल्यानंतर मुलगी जान्हवी हिचा बेडरुममधून किंचाळण्याचा आवाज आला. त्यानंतर जान्हवीला त्या रुममधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, बेडरुमध्ये लावलेल्या सगळ्या पेटींग्स आणि कपाटं या आगीत जळाली. आग लागली तेव्हा बोनी कपूर घरात नव्हते. आगीची माहिती मिळाल्यानंतर ते लगेचच घरी पोहचले. एव्हाना, श्रीदेवी यांनी मुख्य स्विच वेळीच बंद केल्यानं, संपूर्ण घरात ही आग पसरली नव्हती. त्यामुळे पुढचा धोका टळला.
श्रीदेवी यांच्या बिझनेस मॅनेजरनं आग लागल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. शॉट सर्किटमुळे ही आग लागली होती यामध्ये श्रीदेवी यांच्या बेडरुममधील सगळ्या वस्तू जळून नष्ट झाल्यात. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, काही दिवसांपूर्वी कॉमेडियन कपिल शर्मा याच्या ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’च्या सेटवर आणि शाहरुख खानच्या बंगल्यावरही आग लागली होती. कपिलच्या कार्यक्रमाचा सेट आगीत संपूर्ण नष्ट झाला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 22, 2013, 18:55