Last Updated: Monday, April 15, 2013, 16:55
www.24taas.com, मुंबईआमिर खान आणि शाहरुख खान अखेर पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. हिंदी सिनेप्रेमी हा संगम बघण्यास खूपच उत्सुक होते. अखेर त्यांची इच्छा पूर्ण होत आहे. ‘बॉम्बे टॉकीज’ या सिनेमातील एका स्पेशल गाण्यात शाहरुख आणि आमिर एकत्र दिसणार आहे.
बॉम्बे टॉकीजच्या एका गाण्यासाठी शाहरुख खान आणि आमिर खान एकत्र येत आहेत. मात्र या गाण्याचं शुटिंग दोघांनी वेगवेगळं केलं आहे. आपल्या बिझी शेड्युलमुळे आमिर खान आणि शाहरुख खान एकत्र शूट करू शकले नाहीत. त्यामुळे आमिर खानने आपला भाग पूर्ण केला असून शाहरुख खान आता उर्वरीत शुटिंग करणार आहे.
आमिर खानचा या गाण्यातील ब्लॅक अँड व्हाइट फोटो प्रकाशित करण्यात आला आहे. ‘बॉम्बे टॉकीज’ हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीला १०० वर्षं झाल्याबद्दल बनवण्यात येत आहेत. या सिनेमात झोया आख्तर, दिबाकर बॅनर्जी, अनुराग कश्यप आणि करण जोहर या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शन केलं आहे.
First Published: Monday, April 15, 2013, 16:55