Last Updated: Wednesday, December 5, 2012, 15:49
www.24taas.com, मुंबईअभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरूख यांच्यातील तथाकथित संबंधांबद्दल बऱ्याच उलट्या सुलट्या चर्चा चालू असतात. आता या गोष्टींमध्ये खरंच किती तथ्य आहे, हे त्यांनाच माहित. पण, प्रियंकाशी असलेल्या जवळिकीवरून शाहरुख- गौरीच्या वैवाहीक आयुष्यातही वाद निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या.
काही फॅन्सचं म्हणणं होतं, की प्रियंका चोप्राने शाहरुखला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे. मात्र यावर ना शाहरुखने काही स्पष्टिकरण दिलं ना प्रियंकाने. मात्र नुकत्याच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये शाहरुखचा संयम सुटला. माझ्या आणि प्रियंकाच्या मैत्रीबद्दल लोकांनी उलट सुलट चर्च करायला सुरूवात केली. यामुळे मला खूप दुःख झालं आहे. ती माजी खूप चांगली मैत्रीण आहे, याव्यतिरीक्त कुणी नाही. माझं-तिचं नाव जोडून लोकांना काय सिद्ध करायचंय मला माहित नाही. मी स्त्रियांचा आदर करतो. माझ्यामुळे एका स्त्रीचं नाव बदनाम होतंय, हे मला पटत नाही..
शाहरुख एवढंच सांगून निघून गेला असला, तरी त्याने आत्ताच या विषयाला तोंड का फोडलं असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. शाहरुखची पत्नी गौरी हिला प्रियंका चोप्रा अजिबात आवडत नाही. तर, प्रियंकाही आता शाहरुखपेक्षा सलमानशी जवळीक वाढवू लागली आहे. कदाचित या सगळ्याचाच परिणाम शाहरुखवर होत असल्याचं दिसू लागलंय.
First Published: Wednesday, December 5, 2012, 15:49