stardom is temporary, salman khan, 24taas.com

सफलता क्षणभंगूर : सलमान खान

सफलता क्षणभंगूर : सलमान खान
www.24taas.com, नवी दिल्ली
फिल्मी जगतात सफलता क्षणभंगूर असते, असं कोण म्हणतंय माहित आहे... सलमान खान... होय, खुद्द सल्लूनं असं म्हटलंय. आम्हाला माहित आहे की अशी जड-जड विधानं त्याच्याकडून ऐकायची सवय तुम्हाला नाही. पण, तरीही सलमाननं अशी काही वक्तव्यं झाडली आहेत जी कमीत कमी त्याचं अस्तित्व तरी बॉलिवूडमध्ये बराच काळ चर्चेत ठेवतील.

नुकताच रिलीज झालेला सलमान खानचा ‘एक था टायगर’ नवे रेकॉर्ड प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे. आणि याच संबंधात बोलताना सलमाननं म्हटचलंय की, ‘स्टारडम काही काळापूरतंच मर्यादीत असतं. फिल्म्समध्ये मिळालेलं यश हे क्षणभंगूर असतं. त्यामध्ये यश येईलच असं नाही आणि जर अनपेक्षित यश मिळालंच तर त्यासोबत मिळाणाऱ्या सन्मान आणि प्रसिद्धीला खूप सहजतेनं पचवता आलं पाहिजे. कारण हाच अनुभव असतो जो तुम्हाला रागिष्ठही बनवू शकतो’. सध्या फिल्म इंडस्ट्रीत सुरू असलेल्य ‘शंभर करोड क्लब’बद्दल विचारलं असता सलमाननं म्हटलंय, की सिनेमातून पैसे मिळवण्यापेक्षा तो सिनेमाच्या विषयावर जास्त लक्ष केंद्रीत करतो.

अभिनेता सलमान खान आज आपल्या परिवारासोबत ईद साजरी करतोय. पण त्याचा मित्र असलेल्या रितेश देशमुख याचे वडील विलासराव देशमुख यांच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे तो हा सण अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करणार आहे.

First Published: Monday, August 20, 2012, 14:33


comments powered by Disqus