बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन यांचं निधन, Suchitra Sen passes away

बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन यांचं निधन

बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन यांचं निधन
www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता

बंगाली चित्रपट अभिनेत्री सुचित्रा सेन यांचं आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने खासगी रूग्णालयात निधन झाले. गेल्या सहा दिवसांपासून त्यांची तब्बेत खालावली होती. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते.

सुचित्रा सेन यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.

सुचित्रा सेन यांच्या जाण्याने भारतीय बंगाली सिनेमातील एक युग संपुष्टात आलंय. मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील स्थानिक शाळेत मुख्याध्यापक होते. मोठ्या पडद्यावर सुचित्रा सेन आणि उत्तम कुमार या जोडी नावारूपाला होती. त्यांनी दिलीप कुमार यांच्याबरोबर काम केले आहे.

सुचित्रा सेन यांनी एकेकाळी सिनेसृष्टीवर चांगलाच दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या आँधी या सिनेमाने ऐन आणीबाणीच्यावेळी बॉक्स ऑफिसवर धूम केली होती. आँधी सिनेमातली त्यांची भूमिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. तर तुम आ गये, नूर आ गया, इम मोड पें, तेरे बिना जिंदगी से सिकवा, अशी अनेक हिट गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

१९५५ मधील देवदास या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी सुचित्रा सेन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांनी २००५ मध्ये लोकांसमोर न येण्याचे कारण सांगत दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 17, 2014, 09:40


comments powered by Disqus