Last Updated: Thursday, February 14, 2013, 09:43
www.24taas.com, मुंबई फिल्म प्रोड्युसरला धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. याबाबत संजय दत्तच्या नावे समन्स काढण्यात आलंय. त्यामुळे १२ वर्षांपूर्वीच्या भांडणानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.
फिल्म प्रोड्युसर शकील नुरानीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय. २००१ मध्ये संजय दत्तने नुरानीबरोबर फिल्म साईन केली होती. मात्र, ५० लाख रुपये घेऊनही संजय दत्तने त्यानंतर तारखा देण्यास टाळाटाळ केल्याने दोन कोटींचं नुकसान झाल्याचा नुरानीने आरोप केलाय. याप्रकरणी डिसेंबर २०१० मध्ये संजय दत्तचं घर आणि ऑफिसच्या जप्तीचे आदेशही न्यायालयाने दिले होते.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून तक्रार मागे घेण्यासाठी संजय दत्तच्या इशाऱ्याने आपल्याला कराचीतून धमकीचे फोन येत असल्याचा आरोप नुरानीने केलाय. याबाबत कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करू, अशी भूमिका मुंबई पोलिसांनी घेतलीय.
First Published: Thursday, February 14, 2013, 09:43