कर चुकवणाऱ्या अभिनेता सनी देओलला होणार अटक!, Sunny Deol evaded tax of R 1.95 cr; legal notice served

कर चुकवणाऱ्या अभिनेता सनी देओलला होणार अटक!

कर चुकवणाऱ्या अभिनेता सनी देओलला होणार अटक!
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

अभिनेता सनी देओलला सेवाकर बुडवेगिरी आता चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. सनीला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

यमला पगला दिवाना या सिनेमाच्या कॉपी राईट विक्रीद्वारे मिळालेल्या उत्पन्नावरील १ कोटी १८ लाखांचा सेवाकर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी सिनेमाचा निर्माता दिग्दर्शक समीर कर्णिकला अटक करण्यात आली होती. नंतर त्याची २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली होती. त्याबरोबरच सनी देओलवरही याच प्रकरणी सेवाकर विभागाने कारवाईचा बडगा उगारलाय.

सनीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता सनी देओलला अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 24, 2013, 12:11


comments powered by Disqus