सनीला हौस आता आयटम नंबरची..., Sunny item song

सनीला हौस आता आयटम नंबरची...

सनीला हौस आता आयटम नंबरची...
www.24taaas.com, मुंबई

बिग बॉस-५ पासून अख्या जगासमोर गर्वाने वावरणारी पॉर्न स्टार सनी लिऑन बॉलिवूडमध्ये हॉट सीनसाठी चांगलीच चर्चेत आहे. तिच्या हॉट सीनवर दिग्गज दिग्दर्शक महेश भट्ट हेही भलतेच खूश आहेत.

जिस्म-२ चित्रपटात बोल्ड सीन केल्यानंतर पॉर्न स्टार सनी लिऑन आता एक आइटम साँग करीत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा तिचे लटके झटके पाहायला मिळणार आहे. ‘शूट आउट एट वडाला’ या आगामी सिनेमात सनी लिऑन आयटम नंबर सादर करणार अशी बातमी चर्चेत आहे.

प्रियंका चोप्राही तिच्या चाहत्यांना या सिनेमात आयटम साँग करताना पाहायला मिळणार आहे. रागिनी एमएमएस-२ या एकता कपूरच्या आगामी चित्रपटात सनी लिऑन झळकणार आहे. एकता सोबतचा हा तिचा पहिला सिनेमा. जिस्म-२ हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला असला तरी सनीच्या बोल्ड सीनची मात्र चांगलीच चर्चा होती. तिच्या अपकमिंग आयटम साँग आणि एकताच्या चित्रपटात सनी प्रेक्षकांना कशी आकर्षित करेल ते भविष्यात समजेलच.



First Published: Monday, September 24, 2012, 13:52


comments powered by Disqus