‘हॉट’ सनी लिऑन करणार आता ‘अॅक्शन’!, sunny Leon doing action film

‘हॉट’ सनी लिऑन करणार आता ‘अॅक्शन’!

‘हॉट’ सनी लिऑन करणार आता ‘अॅक्शन’!
www.24tass.com , झी मीडिया, मुंबई

पॉर्न स्टार सनी लिऑनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे. सनीच्या बॉलिवूडमधील हॉट एन्ट्रीनंतर आता ती ऍक्शन भूमिकेत आपलं नशीब आजमावणार आहे. दिग्दर्शक देवांग ढोलकीया यांच्या ‘टीना एंड लोलो’ या चित्रपटात सनी लिऑन मारापीटी करताना दिसणार आहे.

आपल्या आगामी अॅक्शन फिल्ममधली आपली भूमिका चांगल्या पद्धतीनं निभावण्यासाठी सनी सध्या ट्रेनिंग घेतेय. चित्रपटाचं शूट लवकरच सुरू होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट पूर्णपणे ऍक्शन पट असून सनी आपल्या भूमिकेबद्दल खूप आनंदी आहे आणि ती खूप मेहनतही करतेय.
छोट्या पडद्यावरील बिग बॉस-५ मधून सनीनं भारतातल्या मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर प्रसिद्ध निर्मात महेश भट्टच्या जिस्म-२ मध्ये तिनं आपल्या उपस्थितीची जाणीव करुन दिली. यानंतर तिचा येणारा दुसरा चित्रपट म्हणजे `रागिनी एमएमएस-2`, शिवाय सनी ‘जॅकपॉट’ या चित्रपटातही काम करतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 6, 2013, 10:48


comments powered by Disqus