Last Updated: Tuesday, October 23, 2012, 09:43
www.24taas.com, मुंबईपॉर्न स्टार सनी लियॉन सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. `जिस्म 2`मध्ये फारशी चमक दाखवू न शकलेली सनी आता मात्र चांगलीच तयारीला लागलेली आहे. आगामी चित्रपटात तिला थिरकण्याची संधी मिळणार आहे. जिस्म -२ मध्ये सनीला काही थिरकता आलं नव्हतं.
त्यामुळे ती निराश झाली होती, मात्र आता तिला थिरकण्याची संधी मिळणार असल्याने तिही भलतीच खूश आहे. बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करायचे असेल तर चांगला डान्स यायला हवा हे सनीला कळले आहे. त्यासाठी सनी सध्या डान्स शिकतेय.
सनीने प्रसिद्ध कोरिओग्राफर शबीना खानकडे नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली आहे. सनी लवकरच रागिनी`एमएमएस 2`चे शुटिंग सुरु करणार आहे. सिनेमांमध्ये डान्स करायची इच्छा असल्याने त्यासाठी तिने प्रयत्नही सुरु केले आहेत.
First Published: Tuesday, October 23, 2012, 09:29