अॅक्शनसीन दरम्यान सनी लिऑन झाली जखमी,Sunny Leone injured on sets of Tina And Lolo

अॅक्शनसीन दरम्यान सनी लिऑन झाली जखमी

अॅक्शनसीन दरम्यान सनी लिऑन झाली जखमी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पॉर्न स्टार ते बॉलीवुड अभिनेत्री सनी लिऑन आगामी सिनेमा ‘टीना अॅड लोलो’ मध्ये काम करताना दिसणार आहे. ‘टीना अॅड लोलो’ हा एक अॅक्शन सिनेमा आहे. या सिनेमात सनी लिऑन आणि करिश्मा तन्ना यांना भारी-भारी स्टंट करायचे आहेत. मात्र अॅक्शन सीन करत असताना सनी लिऑन जखमी झाली आणि तिच्या हाडांना मार लागला. डॉक्टरांनी काही दिवसांसाठी तिला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. परंतु मुंबईतील सेटवर सनी शुटींगसाठी पोहोचण्याची बातमी आली

दिग्दर्शक देवांग ढोलकियाने सांगितले, अॅक्शन सीन दरम्यान दोन्ही मुलींच्या सुरक्षेसाठी पुरेपुर उपाय केले जात आहेत. परंतु दुर्दैवाने सनीला दुखापत झाली. तिची दुखापत फारशी गंभीर नसल्याचं त्यांनी समाधान व्यक्तकेलं आहे. आम्हाला तिच्या प्रोफेशनॅलिझमचं कौतुक आहे. दोन्ही मुलींनी स्वत: स्टंट करण्यावर भर दिला होता आणि म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाय केले जात आहे.

सनी लिऑनने ‘रिअॅलिटी शो’ ‘बिग बॉस-५’ मधून मनोरंजन जगात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. सनीने बॉलीवुडमधील प्रसिद्ध निर्माता ‘महेश भट्ट’ यांच्या ‘जिस्म-२’ मधून एन्ट्री केली.
सनी लिऑनने बॉलीवुडमधील आपल्या पहिल्या सिनेमाच्या उपस्थितीची जाणीव करून दिली होती. याव्यतीरिक्त सनी आता दिग्दर्शक देवांग ढोलकियाचा सिनेमा ‘टीना अॅड लोलो’ मध्ये मारधाडवाली भूमिका निभावणार आहे. या सिनेमात आपल्या पात्राला सहज रुपात उतरविण्यासाठी ती प्रशिक्षण घेत आहे.

सनी लिऑनने आइटम नंबर मध्येही सगळ्यांना मागे टाकले होते. आपल्या पहिल्याच आइटम नंबरने तिने सगळ्यांच्या मनाला जिंकून घेतले. ‘शूट अॅड वडाळा’ या सिनेमामधील साँग ‘लैला तेरी’ हे गाणं चांगलंच गाजलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 12, 2013, 18:00


comments powered by Disqus