sunny leone loves vidya & hrithik-24taas.com

सनी लिऑन विद्या आणि हृतिकच्या प्रेमात

सनी लिऑन विद्या आणि हृतिकच्या प्रेमात

www.24taas.com, मुंबई

बॉलिवूडमध्ये एकीकडे साइझ झीरोची फॅशन आहे आणि जाडेपणाला हास्यास्पद मानलं जातं, तिथे विद्या बालनच्या ‘डर्टी पिक्चर’ने सगळी गणितंच बदलली. डर्टी पिक्चरमधल्या विद्या बालनने धष्टपुष्ट शरीराचं प्रदर्शन करून ग्लॅमर मिळवून दिलं. यामुळे बाकीच्या अभिनेत्रीही या स्पर्धेत उतरायला निघाल्या आहेत.

सनी लिऑन एकता कपूरच्या आगामी ‘रागिणी एमएमएस-2’ या सिनेमात काम करणार आहे. या सिनेमाबद्दल आणि एकता कपूरबद्दल विचारलं असता सनी म्हणाली मी एकता कपूरनी निर्मिती असलेला डर्टी पिक्चर पाहिला.या सिनेमात विद्या बालनला ज्या प्रकारे सादर करण्यात आलंय, ते पाहून मी इंप्रेस झालेय. मला विद्या बालनचा खूप हेवा वाटतोय. विद्या बालनने मांसल शरीराचं प्रदर्शन करून नवा ग्लॅमरस लूक आणलेला आहे. माझ्या शब्दकोशात फॅट (धष्टपुष्ट) हा शब्दच नाही. मला सिनेमा आणि सिनेमातील विद्या बालन खूप आवडले.

याशिवाय बॉलिवूडमधल्या आवडत्या अभिनेत्याबद्दल विचारलं असता सनी लिऑन चक्क लाजली. आपल्या फेव्हरेट अभिनेत्याबद्दल सांगणं म्हणजे आपल्या मनातील त्याच्याबद्दलच्या भावना जाहीर करण्यासारखं आहे. मला हिंदी सिनेमांमधला सगळ्यात आवडता हिरो हृतिक रोशन आहे. मी त्याचा अग्निपथ पाहिला आणि त्यात त्याची शरीरयष्टी पाहून मी त्याच्या प्रेमात पडले आहे. तो खूपच ‘हॉट’ आहे.

First Published: Friday, August 17, 2012, 12:53


comments powered by Disqus