Last Updated: Wednesday, January 16, 2013, 12:30
www.24taas.com, मुंबईपॉर्न स्टार सनी लियॉन आता तिची पहिलावहिला अॅक्शन सिनेमा `टीना और लोलो` यातून आपल्या अदा दाखविणार आहे. सिनेमा दिग्दर्शकाच्या मते, या सिनेमाचे काम मे महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. हा सिनेमा अॅक्शन सिनेमा असणार आहे. पण हा सिनेमा नक्की कशावर बेतलेला असणार आहे याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही.
दिग्दर्शक देवांग ढोलकिया याने सुरवातीला `३ नाईट ४ डेज` या सिनेमाच्या माध्यमातून सिनेमा क्षेत्रात छाप पाडण्याचा प्रयत्न केला होता. सुत्रांच्या मते, सनी लियॉनला ह्या सिनेमाची स्क्रिप्ट आवडली असल्याने ती या सिनेमासाठी तयार झाली आहे. या सिनेमातील इतर कलाकार लवकरच निवडले जातील.
हा सिनेमा पूर्णपणे भारतीय अॅक्शन सिनेमा असणार आहे, या सिनेमासाठी काही खास ट्रेनिंगही देण्यात येणार आहे, सिनेमाच्या शुटींगच्या पहिले सनी लियॉनला देखील खास ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
ढोलकियाने सनीचा जिस्म - २ हा सिनेमा पाहिल्यानंतर सनी लियॉनसोबत काम करण्यासाठी उत्सुक झाला. पण हा सिनेमा अभिनेत्री सनी लिऑनला वेगळ्याच प्रकारे प्रदर्शित करणार असल्याचे म्हंटले आहे.
First Published: Wednesday, January 16, 2013, 12:18