सनीच्या नव्या रासलीला सुरू, खेळणार रासगरबा?, sunny leone playing ras dandiya

सनीच्या नव्या रासलीला सुरू, खेळणार रासगरबा?

सनीच्या नव्या रासलीला सुरू, खेळणार रासगरबा?
www.24taas.com, अहमदाबाद

सनी लियोनने देशभरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे, आपल्या रासलिलांनी साऱ्यांना वेड लावणारी सनी आता रासगरबा खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये. नवरात्रोत्सवात गरबा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु गुजरातमध्ये एका गावातील लोकांमध्ये पोर्न स्टार सनी लियोन गरबा कार्यक्रमात सहभागी होणार असल्याच्या चर्चेने फुट पडली आहे. आयोजकांचा एक गट सनीच्या विरोधात आहे, तर दुसरा गट सनी येणार,या आशेवर बसला आहे.

गुजरातमध्ये पलसाना गावात प्रत्येक वर्षी गरब्याचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये एखाद्या सेलिब्रिटीला बोलावले जाते. यावर्षीच्या गरबा कार्यक्रमात `जिस्म 2` चित्रपटाद्वारे प्रसिद्धी मिळवणारी पोर्न स्टार सनी लियोनला बोलावण्यात आले आहे.

२० ऑक्टोबरला होणा-या गरबा कार्यक्रमात सहभागी होण्याची तयारी सनीने दर्शवली आहे. परंतु आयोजकातील एका गटाचे म्हणणे आहे की, नवरात्रीच्या पवित्र कार्यक्रमात पोर्न स्टार नसावी.


First Published: Sunday, October 14, 2012, 12:09


comments powered by Disqus