रागिनी MMS-२ मध्ये सनी लिऑनची धूम! Sunny Leone practicing hard for her item songs in ‘Tina And Lolo’ and ‘Raa

रागिनी MMS-२ मध्ये सनी लिऑनची धूम!

रागिनी MMS-२ मध्ये सनी लिऑनची धूम!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

पॉर्नस्टार सनी लिऑन सध्या खूप मेहनत घेतांना दिसतेय. आता ती रागिनी MMS-२मध्ये आपला जलवा दाखवणार आहे. बॉलिवूडमधला सनी लिऑनचा पहिला चित्रपट म्हणजे जिस्म-२, पण तो फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर आलेलं शूट आऊट अॅट वडालामधलं तिचं अॅटम साँग चांगलंच गाजलं.

त्याच पावलांवर पुढं चालत आता रागिनी एमएमएस-२ मध्ये ती करत असलेल्या अॅटम साँगसाठी खूप मेहनत करतांना दिसतेय. रागिनी एमएमएस- २ आधी सनी लिऑननं ‘टीना अँड लोलो’ चित्रपटातील गाण्यासाठी जवळपास एक आठवडा घालवला.

सिनेमातल्या अॅटम साँगच्या डांस स्टेप थोड्या कठीण असल्याचं कळतंय. मात्र जराही न घाबरता सनी लिऑन १४-१४ तास मेहनत घेतेय. डांस आणि अॅक्टिंगमध्ये पूर्ण पारंगत होऊन ती बॉलिवूडमध्ये धूम माजवण्यासाठी तयार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 10, 2013, 14:07


comments powered by Disqus