Last Updated: Thursday, August 23, 2012, 17:41
www.24taas.com, मुंबईसनी लिऑनचा पहिला सिनेमा ‘जिस्म-२’ हिट झाला आणि सनी लिऑन भरून पावली. तिचा पहिलाच सिनेमा असल्यामुळे लोकांमध्ये या सिनेमासंदर्भात प्रचंड उत्सुकता होती. तिलाही बॉलिवूडमध्ये काम करायचा अनुभव नवा होता. मात्र, लोक ‘ज्या’ अपेक्षेने सिनेमा पाहायला गेले, ‘ती’ अपेक्षा त्यांची पूर्ण झालीच नाही. आणि याबद्दल सनीने चक्क लोकांची माफी मागितली आहे.
पूजा भट्टने जेव्हा ‘जिस्म-२’साठी सनी लिऑनला करारबद्ध केलं, तेव्हा भारतभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. एका पॉर्नस्टारने भारतीय सिनेमात काम करणं, तिला प्रसिद्धी मिळणं कुणालाही पसंत नव्हतं. पण मनातून बरेच पुरूष या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात होते. यापूर्वी X-रेटेड सिनेमात दिसलेली सनी लिऑन भारतीय सिनेमात कुठल्या स्वरुपात पाहायला मिळतेय याची सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र, ‘जिस्म-२’मध्ये सनी लिऑनने इतर अभिनेत्रींपेक्षा अजिबात वेगळं काही केलं नव्हतं. तिने अपेक्षित अंगप्रदर्शन न केल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला.
ही गोष्ट जेव्हा सनी लिऑनला समजली, तेव्हा तिने चक्क या गोष्टीबद्दल प्रेक्षकांची माफी मागितली. “भारतातील नियम खूप कडक आहेत. सेंसॉर बोर्डालाही आम्हाला उत्तर द्यायचं असतं. जगभरात सगळीकडे पॉर्न इंडस्ट्री आहे. पण भारतीय सिनेमात काम करताना भारतीयांच्या अभिरुचीला पटेल, रुचेल इतपतच अंगप्रदर्शन मी केलं. हा सिनेमा मुख्य प्रवाहातला हिंदी सिनेमा असल्याने मी तशी काळजी घेतली.” असं सनी लिऑन म्हणाली.
जेव्हा सनीला आपल्या प्रेक्षकांचा हिरमोड झाल्याचं समजलं, तेव्हा ती हसत म्हणाली, “प्रेक्षकांच्या अपेक्षांना पुरेस अंगप्रदर्शन मी न केल्याबद्दल मी माफी मागते. पण त्यांनी तिकीट काढून माझा सिनेमा पाहिला, याबद्दल धन्यवाद”
आता आगामी रागिणी-एमएमएसमध्ये प्रेक्षकांच्या अपेक्षा सनी पूर्ण करेल का?
First Published: Thursday, August 23, 2012, 16:00