Last Updated: Wednesday, October 17, 2012, 13:42
www.24taas.com, मुंबईइंडो-कॅनेडियन पार्न स्टार सनी लियॉनने जिस्म-२ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने लगेचच आणखी तीन सिनेमे साईन केले आहेत.
सनीचा पहिला सिनेमा हा २०१३ च्या शेवटी चित्रीत करण्यात येणार आहे तर... उरलेले सिनेमा त्यानंतर
शूट केले जाणार आहेत. अलंबरा एंटरटेनमेंटक़डून सिनेमाचा विषय आणि कलाकार यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.
जिस्म - २ नंतर सनी लियॉन रागिणी MMS २ या सिनेमातून झळकणार आहे. अलंबरा एंटरटेनमेंट यांच्याकडून सनीचं नाव निश्चित असल्याचे सांगण्यात आलं आहे. जिस्म - २ या सिनेमात सनी फार काही जादू दाखवू शकली नाही. तिच्या आगामी सिनेमात ती प्रेक्षकांना भुरळ घालू शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First Published: Wednesday, October 17, 2012, 13:30