Last Updated: Wednesday, April 17, 2013, 14:52
www.24taas.com, मुंबईएका पुस्तकात एक खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील एबटाबादमध्ये जिथे अल-कायदाचा आतंकवादी ओसामा बिन लादेनला अमेरिकी सैन्याने कंठस्नान घेतलो होते. ज्या ठिकाणी लादेनला मारण्यात आलं. त्याच्या आजूबाजूला अनेक पॉर्न व्हिडिओच्या सीडी होत्या. त्या अमेरिकी कमोंडोंनी लगेचच ताब्यात घेतल्या. त्या सीडीबाबत सांगण्यात आलं की, त्या पॉर्न सीडी सनी लिऑनच्या होत्या. खुलासा असा करण्यात आला आहे की, ओसामा बिन लादेन सनी लिऑनच्या पॉर्न व्हिडिओ नेहमी बघत असे.
सनी लिऑन आणि ओसामा बिन लादेन ह्यांची कधी मुलाखत तर झाली नव्हती. डीएनएने जेव्हा सनी लिऑनला विचारणा केली की, ओसामा तिचा फारच फॅन होता. तेव्हा सनी लिऑनने फारच बोलकी प्रतिक्रिया दिली. हा एखादा विनोद असावा. आणि मी असा विचारही करत नाही, की असं काही झालं असेल.
तिने ओसामा आणि आतंकवाद यावर बोलण्यास नकार दिला. मात्र तिने तिच्या एका फॅनबाबत सांगितले. ‘एका विद्यार्थ्याने वर्जिन ट्रीवर तिचा फोटो चिपकवला होता. आणि त्यावर्षीचं गेस्ट म्हणून त्याने मला आमंत्रित केलं होतं. त्याने असं करून माझं हृदय जिकलं होतं.
First Published: Wednesday, April 17, 2013, 14:52