आता सनी लिऑन बनणार चोर Sunny Leone to play theif in `Jackpot`

आता सनी लिऑन बनणार चोर

आता सनी लिऑन बनणार चोर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आगामी ‘जॅकपॉट’ या सिनेमात पॉर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन चोराची भूमिका करणार आहे. या सिनेमातही सचिन जोशीसोबत सनी लिऑनचे हॉट सीन्स असतील.

कैझाद गुस्ताद या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. यापूर्वी कैझादने ‘बॉम्बे बॉइज’ आणि ‘बूम’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. हे दोन्हीही सिनेमे बोल्ड सिनेमे म्हणून प्रसिद्ध होते. आगामी जॅकपॉट सिनेमात सनी लिऑनला चोराची भूमिका करणार आहे. यापूर्वी ‘जिस्म २ ‘या सिनेमात सनीने पॉर्नस्टारचीच भूमिका केली होती. तर ‘शूट आऊट अट वडाला’ सिनेमात तिने हॉट आयटम साँग केलं होतं. एकता कपूरच्या आगामी रागिणी एमएमएस २ सिनेमात सनी काम करत आहे. ‘जॅकपॉट’ सिनेमात प्रथमच सनी चोराच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र या ही सिनेमात सनी लिऑनचे सचिन जोशीसोबत हॉट सीन्स आहेत.

“आम्ही या सिनेमात हॉट सीन्स दिले आहेत. मात्र आता ते कशआ प्रकारे पाहायचे, हे प्रेक्षकांवर अवलंबून आहे. याबद्दल मी अधिक काही सांगणार नाही. मात्र एकच सांगतो, की हे सीन्स व्हल्गर नाहीत.” असं सचिन जोशीने यासंदर्भात म्हटलं आहे. सचिन जोशी याने यापूर्वी ‘अजान’ आणि ‘मुंबई मिरर’ या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, August 4, 2013, 15:52


comments powered by Disqus