Last Updated: Tuesday, November 27, 2012, 10:37
www.24taas.com, मुंबईपॉर्न स्टार सनी लियॉन नेहमीच विवादात राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळेच नेहमी चर्चेतही राहणं सनीला जमतं. सनीचा नुकताच एक सिनेमा येऊन गेला आणि त्यानंतर सनी लियॉनकडे अनेक सिनेमा आणि आयटम साँगसाठी विचारणा होत होती. पण नुकतच सनी देओलने सनी लियॉनला सिनेमा ऑफर केला होता. मात्र सनी लियॉनने हा सिनेमा सरळसरळ धुडकावून टाकला. सूत्रांच्या मते, सनीला कमी पैसे मिळत होते आणि त्यामुळेच हा सिनेमा धुडकावून टाकला.
तसेच अनिल शर्माच्या आगामी सिनेमात आयटम साँग मध्ये काम करण्यासाठीही नकार दिलेला आहे. सनीला आयटम साँगसाठी देखील कमी पैसे दिले जात असल्याने तिने असं पाऊल उचलंल. सनीला एका आयटम साँगसाठी ५० लाख रूपयांची ऑफर देण्य़ात आली होती. तरीही सनीने ही ऑफर नाकारली.
सनी देओलच्या सिनेमात कमी पैसे मिळत असल्याने तिने हा सिनेमा नाकारला. याआधी सनी देओलने सनीच्या या सिनेमात काम करण्याबाबत शंका घेतली होती. एक पॉर्न स्टार असल्याने हा त्यांनी सिनेमात काम करण्यासाठी नकार दिला होता असेही कळते.
First Published: Monday, November 26, 2012, 22:15