सनी लिऑन सिनेमा प्रमोशनसाठी भुतांच्या जागावर , Sunny Leone will be haunted places for Film Promotion

सनी लिऑन सिनेमा प्रमोशनसाठी भुतांच्या जागावर

सनी लिऑन सिनेमा प्रमोशनसाठी भुतांच्या जागावर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एकता कपूर काय करील याचा भरवसा नाही. एकताने आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हटके आणि तेवढाच धाडसी प्रयोग केलाय. तिने सिनेमाच्या प्रमोशनसाठी भुतांची जागा निवडण्याचा फंडा शोधलाय. तसे तिने देशातील अशा जागा शोधून त्याठिकाणी सिनेमाचे प्रमोशन करणार आहे.

`रागिनी एमएमएस-2` या सिनेमा मार्केटिंगसाठी एकता कपूरने नामी क्लृप्ती शोधली आहे. या सिनेमाची नायिका आहे सनी लिऑन. सनी भुतांच्या जागांवर जाऊन सिनेमाचे प्रमोशन करणार आहे. सनी देशातील वेगवेगळ्या शहारांचा दौरा करेल. ज्या शहरातील जागा या भुतांच्या म्हणून ओळखल्या जातात त्या ठिकाणी सनी आपल्या सिनेमाचे प्रमोशन करेल, असे एकताने स्पष्ट केले आहे.

21 मार्च रोजी `रागिनी एमएमएस-2` को रिलीज करण्याचा चंग बांधण्यात आला आहे. "रागिनी एमएमएस" या सिनेमाचा पुढचा भाग आहे. या सिनेमाकडून अनेक अपेक्षा आहेत. आपला सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकताने मार्केटिंगचा नवा फंडा शोधला आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 13, 2014, 23:09


comments powered by Disqus