Last Updated: Monday, September 10, 2012, 18:51
www.24taas.com, ‘जिस्म-२’ या इरॉटिक थ्रिलरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सनी लिऑनला आता कौटुंबिक सिनेमांमध्ये काम करायची इच्छा आहे.
सनी म्हणाली, “माझी इच्छा आहे की माझा आगामी सिनेमा हा कौटुंबिक सिनेमा असावा. जर ठरल्याप्रमाणे गोष्टी घडत गेल्या, तर माझा आगामी सिनेमा हा कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा असलेला असेल.”
२०११ साली आलेल्या रागिणी एमएमएस या सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या शुटिंगमध्ये सनी सध्या व्यस्त आहे. जिस्म-२ नंतरची ही सनीची दुसरी फिल्म आहे. या सिनेमानंतर तिला दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या सिनेमांसाठी विचारणा केली आहे. सनी आता कुठला सिनेमा साइन करणार आहे, याबद्दल तिने काही सांगितलं नसलं, तरी तिला मात्र कौटुंबिक सिनेमा करायचा आहे.
First Published: Monday, September 10, 2012, 18:51