Last Updated: Tuesday, May 6, 2014, 07:23
www.24taas.com, झी मीडिया, चेन्नईतामिळ चित्रपटाचे महानायक रजनीकांत आज मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरशी जोडले गेले असून त्यांनी या सोशल मीडियाच्या व्यासपीठावर आपली उपस्थिती नोंदवली आहे.
रजनी यांनी पहिला ट्वीट केला की, ‘ईश्वरा, सर्वांचे आभार, माझ्या चाहत्यांना खूप खूप धन्यवाद... मी माझ्या डिजिटल यात्रेसाठी खूप उत्साहित आहे.
देश विदेशात प्रसिद्ध असलेले ६३ वर्षीय या महानायकाला @SuperStarRajini द्वारे फॉलो करा. त्यांनी सांगितले, मी सोशल मीडियावर आपल्या प्रशंसकांशी जोडलो गेलो याचा मला आनंद आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीही रजनीकांत यांना फॉलो केले आहे. मोदी म्हणाले रजनीकांत ट्विटर आल्याबद्ल आनंद आहे. वेलकम....
ही बातमी करत असताना रजनीकांत यांना सुमारे १ लाख ११ हजार जणांनी फॉलो केले होते.
रजनी ट्विटरवर आल्याबद्दल तामिळ चित्रपट सृष्टी आणि राजकारणांनी आनंद व्यक्त केला आहे. रजनीकांत यांचा कोचाड्डीयन गेल्या शुक्रवारी रिलीज झाला या चित्रपटाची दिग्दर्शन त्यांची मुलगी सौंदर्याने केला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 5, 2014, 20:37